मोहटा देवी यात्रा; सुजय विखेंचा लंकेवर अप्रत्यक्ष वार पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी यात्रा काढतात, पण पदावर आल्यानंतर तीच यात्रा बंद करतात: सुजय विखे पाटील अहिल्यानगर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मोहटा देवी यात्रेत आज राजकीय आरोप प्रत्यारोपांची झलक दिसली. सावेडी टीव्ही सेंटर येथून विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश सोनवणे यांच्या वतीने माता भगिनींसाठी सुरू झालेल्या मोफत दर्शन यात्रेचा शुभारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.