यवतमाळ शहरातील बाजोरीया नगर परिसरामध्ये असणाऱ्या विदर्भ हाउसिंग सोसायटीतील एका इसमाने रात्रीच्या सुमारास घरामध्ये बाथरूम जवळ असलेल्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अजय सिताराम सूर्यवंशी वय वर्ष अंदाजे (36) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.आत्महत्या मागचे कारण मात्र कळू शकले नाही. मृतकाच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अवधुतवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.