नरखेड पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या व सट्टापट्टी चालविणाऱ्यांवर कार्यवाही केली आहे. गोंडेगाव रोडवर किशोर वरखडे अनिल परतेती,मनोहर धुर्वे यांना जुगार खेळताना पकडून 1520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे खरसोली येथे अक्षय तायवाडे याला सत्तापट्टी चालविताना पकडून त्याच्याकडून 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोंडेगाव येथे आरोपी प्रशांत दुर्वे याला सट्टापट्टी चालविताना पकडून त्याच्याकडून 663 रुपये जप्त करण्यात आले आहे.