कर्जात अडकलेला शेतकरी, थकित बिलात अडकलेला कंत्राटदार दोघांनाही सरकारने मृत्यूच्या दारात ढकललं.महिनाभरापूर्वी एका युवा कंत्राटदाराने थकीत बिलामुळे आत्महत्या केली आणि आता प्रेमवच्छा वर्मा यांनाही सरकारच्या छळामुळे जीवन संपवावं लागलं.शेतकरी निसर्गाने मरतो, कंत्राटदार सरकारच्या अन्यायाने मरतो. ना शेतकऱ्याला मदत, ना कंत्राटदाराला बिल. मग ते जगणार तरी कसं?असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.