मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेला शासन निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी १२ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शिरपूर तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.त्यानंतर तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार पंकज मगर यांनी स्वीकारले.या वेळी ओबीसी प्रवर्गातील विविध समाजांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.