शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वेचे साहित्य चोरीचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला आहे. शहरातील मार्डन रोडवरील अमर स्टोअर्सजवळ तीन संशयित इसम पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लोटगाडी वरून रेल्वेचे स्लिपर चोरून वाहतूक करीत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे.