पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या दहेगाव रंगारी येथे एटीएम मशीन मध्ये लोखंडी पट्टी टाकून रक्कम पळविणाऱ्या दोघांना नागरिकांच्या सतर्कतेने रंगेहात अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपीचे नाव विशाल नायक व अनुप मोरे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान आरोपींचा एक साथीदार फरार झाला. दहेगाव रंगारी येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम जवळ हे आरोपी फिरत असताना तेथील सतर्क नागरिकांना यांच्यावर संशय आला. दरम्यान त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.