राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार समितीचे राज्य कार्याध्यक्ष पदी हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर यांची एकमुखाने समितीच्या वतीने निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने देऊळगाव माळी येथील गावकऱ्यांच्या वतीने त्याचबरोबर देऊळगाव माळी येथील संघर्ष समिती च्या वतीने प्रकाश महाराज मगर यांचे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांच्या वतीने बी.के.सुरूशे यांनी त्यांचा सत्कार केला.