Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: मोटरसायकल चोरणारी आंतरजिल्ह्यातील टोळी रिसोड पोलिसांच्या जाळ्यात,12 मोटरसायकली जप्त

Washim, Washim | Sep 9, 2025
संपूर्ण जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असताना रिसोड पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्ह्यातील टोळीला दि. 9 सप्टेंबर रोजी जेरबंद केले आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 8 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 12 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मयूर प्रवीण नवले वय 21 व गजानन उर्फ गणेश बळीराम गायकवाड दोघे रा. माणुसकी नगर, रिसोड जि. वाशिम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us