ठाणेकरांच्या सोबत उद्धट वागणूक करणाऱ्या बजाज फायनान्सला आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास समाजसेवक संगम डोंगरे यांचा दणका दिला आहे. आरबीआयने दिलेल्या नियमांचे पालन करीत नसून अर्वाच्च भाषा, शिवीगाळ, गुंडगिरी,आई-बहीण यांना खालच्या पातळीवर टीका करणे अश्या अनेक समस्यां नागरिकाना भेडसावत असतात त्यातीलच ही घटना घडली यावर समाजसेवक संगम डोंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याच्या कार्यालयात धुमाकूळ घातला.