धुळे शहरात गणरायाचे आगमन भक्तिमय वातावरणात झाले. इंग्रज काळापासूनचा ऐतिहासिक वारसा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मानाच्या खुनी गणपतीची आज जल्लोषात स्थापना झाली. फुलांनी सजवलेल्या पालखीतून निघालेल्या भव्य मिरवणुकीत टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाचे नामस्मरण झाले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने परिसर दणाणला. हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुढील दहा दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.