अकोले तालुक्यातील विहीरगाव फाटा येथे आज महिला बेकायदेशीर दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक झाल्या होत्या.रास्ता रोको करत रस्त्यावरच दारूच्या बाटल्या फोडत महिलांनी निषेध व्यक्त केला. यावेळेस परिसरातील सामाजिक कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.