बुधवार दि. ३० जुलै रोजी छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठान आणि चिखली तालुका व शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी बैठक मोठ्या उत्साहात परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान चिखली येथे पार पडली. या वेळी राहुल बोंद्रे बोलत होते. या बैठकीत दहीहंडी साजरी करताना घ्यावयाची सुरक्षा, वेळापत्रक, कार्यक्रमाची रूपरेषा, सांस्कृतिक कार्यक्रम, गोविंदा पथकांच्या सुविधा, पुरस्कार योजना, व इतर महत्वाच्या बाबींची सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.