धाराशिव जिल्ह्यातील विविध ठिकाणी पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना 25 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आले. हा चौथ्या स्तंभावर हल्ला आहे असे म्हणत यावर प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन दिले.