पालघरच्या पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनोर येथे भेट दिली. वैतरणा नदी किनारी असलेल्या विसर्जन स्थळाला भेट देत पोलीस अधीक्षकांनी विसर्जन स्थळाची पाहणी केली व सुरक्षा व्यवस्थेबाबतचा आढावा घेतला. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सुरक्षा व्यवस्थेबाबत व विसर्जन सुरळीत पार पाडण्याबाबत आवश्यक त्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.