राजकीय आरोग्य अभियान (एनाआरएचएम) अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्या आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेवर सोमवारी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. मारुती मंदिर चे जिल्हा परिषदे अशा जोरदार घोषणाबाजीत काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने हे कर्मचारी सहभागी होते. शासनाने त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.