चाकण येथे एका इसमाची मशीन देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २५ जानेवारी ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चाकण मधील दावडमळा येथे घडली. या प्रकरणी दयानंद फकिरप्पा कुंभार (वय ४२, दावडमळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मॅनेजर गणेश नाथगोसावी आणि हेमंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.