बुलढाणा शहरातील मलकापूर रोड, नगरपालिका व्यापारी संकुल येथे २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सम्राट आखाडा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसराचा दौरा करून बुद्धविहारासह महामानवांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्वरित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या व निराकरण करण्याचे काम केले.