उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दौऱ्यावर निमित्त सोलापूर येथे आले होते. यावेळी जुना पुणे नाका येथे नाल्यात वाहत गेलेल्या रिक्षा चालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, किसन जाधव, गणेश पुजारी यांनी बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान अजित पवारांनी तातडीने संबंधित प्रशासनाला फोन लावून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.