उमरगा तालुक्यातील एका गावामध्ये 23 वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून डिसेंबर 2019 ते एप्रिल 2025 या काळात एका तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. अतिप्रसंगाची घटना मोबाईलमध्ये कैद केली व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद पीडित तरुणीच्या आईने २ सप्टेंबर रोजी दिली आहे, अशी माहिती उमरगा पोलिसांच्या वतीने तीन सप्टेंबर रोजी २ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.