करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गांवर अज्ञात व्यक्तीने रातोरात अनधिकृतरीत्या गतिरोधक टाकल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवार दि १० सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री रस्त्यावर सिमेंट काँक्रीट टाकुन दोन ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. या गतिरोधकांची उंची जास्त असल्यामुळे अनेक चारचाकी वाहने या गतिरोधकाला खालच्या बाजुने घासत आहे.