खेड तालुक्यातील भोस्ते येथे किरकोळवादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडीने सायकल ला कट मारण्याच्या संशयावरून सुरू झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून यात फिर्यादीसह त्यांच्या मदतीला आलेल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी ११ जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.