तिरोडा-खैरलांजी मार्गावर सी.जे.पटेल कॉलेज तिरोडा समोर भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ (क्रमांक MH23Y 0398) चे नियंत्रण सुटल्याने दुचाकी (क्रमांक MH49B S2456) ला जोरदार धडक बसली. यानंतर स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला खाली घसरली. तर दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.