रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या एका शाळकरी मुलाच्या अंगावर वसई आनंदनगर परिसरात पथदिव्याचा खांब कोसळल्याची घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या सात वर्षाच्या पार्थ शर्मा या मुलाच्या अंगावर आनंदनगर परिसरात अचानक पथदिवेचा खांब कोसळला या घटनेत पार्थ किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत पार्थ थोडक्यात बचावला आहे.