बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबुन शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन नुकसानीची पाहणी करण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे चिखली तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.