नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभर धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थही भक्तिभावाने देवीची आराधना करत आहेत. अशाच भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात चाप्रड पहाडी येथील श्री सार्वजनिक नवरदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरदुर्गा माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भेट देऊन नवरदुर्गा मातेला विधीपूर्वक दर्शन घेतले.