संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णा नदीच्या घाट व पूरपरिस्थिती परिसराची विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी पाहणी केली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. नदीकाठच्या लोकांनी काळजी करू नये, मात्र सतर्कता बाळगावी असे आवाहन करून आमदार इद्रिस नायकवडी पुढे म्हणाले आवश्यकते नुसार नागरिक आणि पशुधनांच्या स्थलांतराचे सर्व नियोजन तयार आहे, महसूल प्रशासन पोलीस महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असून, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन तयार आहे असेही