मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्यसरकारने मंत्रीमंडळाची उपसमिती पुनर्गठीत करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी राहात्याचे लोकप्रतिनिधी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आज २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. निवड करण्यात आली आहे. मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.