प्राथमिक आरोग्यकेंद्र म्हसावद च्या वतीने माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा,डोमगाव येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल सर तसेच RBSK टिम डॉ लिना बडगुजर, डॉ उमेश पाटिल तसेच यांचे सर्व सहकारी तालूका लसिकरण अधिकारी अश्विनी पाटिल मॅडम व प्रा आ केंद्राचे कर्मचारी यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विशेषतः अंगावर कोणत्याही प्रकारचे पुरळ, त्वचेवरील विकार किंवा साथीचे लक्षण आहे की नाही याची खातरजमा करण्यात आली. सर्व विद्यार्थी निरोगी असून कोणत्याही प्रकारच्या पुरळाची लक्षणे आढळून आली नाहीत, हे समाधानकारक निदर्शनास आले.