दिनांक १० सप्टेंबर रोजी बदलापूर पश्चिम येथील येरंझड गावात एका बियर शॉप मध्ये चोरी झाली होती. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासणी करून आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अटक केली असल्याची माहिती बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे यांनी आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास दिली आहे.