अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती विसर्जनादरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी वसई विरार परिसरातील विसर्जन स्थळांना भेट देत विसर्जन स्थळांची पाहणी केली. किल्ला जेटी, मधुबन खदान व इतर विसर्जन स्थळांची पाहणी करत आयुक्तांनी सुरक्षा उपाययोजना, महानगरपालिके मार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी,पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.