पिंपळगाव राजा ते नांदुरा दरम्यान बस फेऱ्या वाळून मेळाव्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस फेऱ्या देण्यात याव्या यासाठी शाळकरी मुलींनी महामंडळाची बस रोखून ठेवली आहे. आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता पासून या विद्यार्थिनींनी रस्त्यामध्ये बसून बस रोखून ठेवली आहे. या बस मध्ये पिंपळगाव राजा पासून सर्व विद्यार्थिनी बसलेल्या आहेत तसेच आज दहावी आणि बारावीची परीक्षा सुद्धा आहे.यामुळे.त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस सोडावी अशी मागणी आहे.