सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनगरवाडी येथील गणपती मंदिरासमोर दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास विपूल भानुदास बेबले वय १९, रा. गणेश चौक कोडोली यास तो व त्याचा मित्र आर्यन कळंत्रे हे दोघे बसलेले होते. तेव्हा तेथे कोडोली येथील तीन जण आले. त्यांनी त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. ते दिले नाहीत म्हणानें फायटर अन् लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्या प्रकरणी विपूलने तीन जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल केला.