भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला पाणी मिळावे यासाठी नळाची पाईपलाईन टाकलेली आहे.साकोलीकडून तुमसर कडे जाणाऱ्या मार्गावर पिंडकेपार,एकोडी, उसगाव, चांदोरी इथपर्यंत नळाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे शनिवार दि.13 सप्टेंबरला दुपारी12.30 वाजता साकोलीतील एकोडी रोडवरील आशीर्वाद बारच्या समोर ही पाईपलाईन फूटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.साकोलीतील संबंधित कार्यालयाला नागरिकांनी तक्रार करूनही अजून पर्यंत दखल मात्र घेतली गेली नाही