नालासोपारा परिसरात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे नालासोपारा पूर्व परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. डॉन लेन, आचोळे, तुळींज रस्ता याठिकाणी पावसामुळे पाणी साचले असून, रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकाची मोठी गैरसोय होत असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक, नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.