सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले. असून गाव, वाड्या, वस्त्या, नाले, ओढे सह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक, शेतकरी भयभित झाले आहेत. शेतकऱ्याचे उडीद, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन भरपावसात पाहणी केली.