धुळे जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत, हा सण शांततेत, उत्साहात आणि नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी केले आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि मोठ्या संख्येने होमगार्ड्सही दाखल झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.