ऑनलाईन शेअर ट्रेडिंगचे काम करणाऱ्याची दीड कोटी रुपयांची फसवणुक करणाऱ्या परदेशातील चोरट्यांशी संगनमत साधून त्यांच्यासाठी काम करणारा दोघा भामट्यांना सायबर पोलिसांनी उर्से टोलनाका येथे पाठलाग करुन पकडले.अक्रम शमशुद्दीन शेख,व त्याचा साथीदार विनय सत्यनारायण राठी (वय ३४ दोघेही राहणार इचलकरंजी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.