धुळे तालुक्यातील नेर येथील सावता माळी मंदिरात एस. एम. बियाणी विधी महाविद्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित झाले. महिलांची सुरक्षा, पर्यायी वाद निवारण, नागरिकांची कर्तव्ये व शासनाच्या योजना यावर मार्गदर्शन झाले. सचिव प्रविण एन. कुलकर्णी यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बालविवाह’ या सामाजिक समस्येवरील पथनाट्य विशेष आकर्षण ठरले.