पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या गंज पेठेमध्ये चक्क गांजापासून भांग तयार करण्याचा कारखाना चालवला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खडक (Khadak Police Station) पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत तब्बल ३५१ किलो पावडर, २८० भांगेचे गोळे, भांग तयार करण्यासाठी वापरलेली मशीन, वजनकाटे, फ्रिज, शेगडी, पातेले आदी साहित्य आणि रोकड जप्त केली