पंचायत समिती मूल अंतर्गत येत असलेल्या हळदी गावगत्रा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक हेराफेरी करण्यात आली बोगस आणि नियमबाह्य पद्धतीने संगणमताने शासकीय निधीची लूट करण्यात आली याबाबत गावकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आहे ग्रामपंचायत संबंधित ग्रामसेवक आणि संगणक परिचालक यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे