घनसावंगी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आमदार हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार हिकमत दादा उढाण यांनी पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले व आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, उपस्थित होते.