घरातून मोबाइल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथील पंतनगर येथे घडली. आरोपी नागेश देवेंद्र गलबिले ( चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी फरीन मुस्ताक खान (रा. पंतनगर, जाधववाडी, चिंचवड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.