ग्रामीण भागात असलेल्या पानमारा शेतशिवारात चरण्यासाठी नेलेल्या गाईवर वाघाने हल्ला करून गायीची शिकार केल्याची घटना घडली याबाबत चे वृत्त असे की शेतकरी मनोहर मेश्राम यांनी शेतशिवारात जनावरे चरण्यासाठी नेले असता शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर वाघाने गायीची शिकार केली. शेतकरी घाबरून गावात आले आणि गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली .गावकरी शेतशिवारात गेले असता गाय मृत अवस्थेत आढळून आली.घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.