एक महिला आपल्या घरी असतांना दुपारच्या सुमारास काही अनोळखी इसमांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी आले. महिलेने पाणी देताच अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळुन गेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी सकाळी साडे ११ वाजताच्या सुमारास चान्ना धानला येथे उघडकीस आली आहे. या घटनेत अज्ञात आरोपींनी गणेश मनोहर लांजेवार यांच्या आईच्या गळ्यातील ४ ग्राम सोन्याचा पदक व ४ ग्राम सोन्याचे मनी असा एकुण २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन गेले.