तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 31 ऑगस्ट ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार पर्स मधून सोने चोरून येणाऱ्या महिला टोळीला तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.