नाशिक ग्रामीण जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सक्रिय असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडीवऱ्हे पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चौघाजण पल्सर मोटारसायकलवरून प्राणघातक शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ४ जणांना अटक केली. यामध्ये सतीश लोहरे (आंबे बहुला), रोशन कचरे, कृष्णा दुटे, व संतोष लहांगे (लहांगेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून २ तलवारी, चॉपर, कोयता, एक प्लास्टिक पिस्तुलसदृश खेळणी आणि २ पल्सर गाड्या असा