राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. 6 ऑक्टोबर रोजी मुंबईत 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये वाशिम नगर पालिकेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, यावर स्थानिक पातळीवरील राजकारण्यांनी राजकीय समीकरणे ठरविण्यास सुरुवात केली आहे. आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नजरा लागल्या होत्या.