चाळीसगाव : आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने रूट मार्च काढला.