बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी दुसऱ्या बँकेतून पैसे आणून बेडरूम मधील आलमारी मध्ये लॉक करून ठेवले होते. काही कामकाज असल्याने आलमारी कुलूप बंद करून बाहेरगावी गेल्याचे पाहून एकाने त्यांच्या घरात प्रवेश करून बोर्डावर ठेवलेली चावी घेऊन आलमारीचा कुलूप खोलून त्यातील १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास चिचाळ येथे उघडकीस आली. श्रीकृष्ण नत्थुजी काटेखाये (५५) रा चिचाळ यांनी तक्रार दिली.